देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द येथील श्री देव गणपती मंदिराचा तिसरा वर्धापन दिन व माघी गणेश उत्सव दि. २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
यात बुधवार दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ८ वा श्रींची विधिवत पूजा. सायं. ५ पासून संगमेश्वर तालुक्यातील भजनी कलाकारांचा चक्री भजनाचा कार्यक्रम. गुरुवार दि. ३० सकाळी ८ वा श्रीची विधिवत पूजा, दुपारी २ ते ५ वा ओझरे खुर्द स्वामी समर्थ मठ ते श्री देव गणपती मंदिर भक्तगणांची शोभायात्रा काढली जाणार आहे. सायं ७ वा. महाआरती, रात्री ९ वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे.

शुक्रवार दि. ३१ रोजी सकाळी ८ वा. श्रींची विधिवत पूजा, सकाळी ९ वा. सहस्त्रावर्तन, सायं. ७ वा महाआरती, रात्री ९ ह. भ. प. डॉ. दत्तराज शास्त्री वाडदेकर यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. ह.भ.प. वाडदेकर बुवा यांचे गणेश जन्मकाळ कीर्तन होणार आहे. याला तबला साथ ऋषिकेश आचार्य (देवरूख), संवादिनी साथ आशिष प्रभुदेसाई (देवरूख) यांची लाभणार आहे. दुपारी १ ते ३ वा महाप्रसाद. दुपारी १ वाजल्यापासून दर्शन सोहळा, नवस फेडणे व नवस बोलणे, सायं. ७ वा. सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ गणेशवाडीचे भजन, रात्री १० वा. दिंडी (प्रदक्षिणा) होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभगणेश भक्तांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 29/Jan/2025












