टपाल, मनीऑर्डर व पार्सल सेवांविषयीच्या तक्रारींवर होणार थेट निवारण; अधीक्षक डाकघर कार्यालयात होणार सुनावणी
चिपळूण :
Chiplun Divisional Dak Adalat News अंतर्गत टपाल सेवांशी संबंधित प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी चिपळूण येथे ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विभागीय डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत अधीक्षक डाकघर कार्यालय, चिपळूण नगर परिषदेसमोर, चिपळूण येथे पार पडेल.
तक्रारींचे निवारण अन् अर्जाची प्रक्रिया
सर्वसाधारण टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डर यासह टपाल विभागाच्या कामकाजासंबंधी अद्याप निराकरण न झालेल्या किंवा समाधानकारक उत्तर न मिळालेल्या तक्रारींची दखल या अदालतीत घेतली जाईल.
नियम व अटी: तक्रारदाराने एका अर्जात केवळ एकाच तक्रारीचा उल्लेख करावा. अर्जात समस्येचा आवश्यक तपशील स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: तक्रार अर्ज अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, चिपळूण नगर परिषदेसमोर, चिपळूण – ४१५६०५ या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
अंतिम मुदत: अर्ज ६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कार्यालयात पोहोचणे आवश्यक होते, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:49 07-10-2026














