चिपळूण : फन-एन-फेअरमध्ये ‘शीशमहल’चे आकर्षण

चिपळूण : येथील रोटरॅक्ट फन-एन-फेअरमध्ये यावर्षी ‘शीशमहल’ साकारण्यात आला आहे. दरवर्षी या महोत्सवाचे वैशिष्ट्य असते. कारण या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असा देखावा (सेट) उभारला जातो. यावर्षीचे आकर्षण म्हणजे शीशमहल असून, महलचा सेट पाहण्यासाठी चिपळूणसह जिल्हाभरातून लोक गर्दी करीत आहेत.

फन-एन्-फेअर चिपळुणात १ फेब्रुवारीपर्यंत सुरू आहे. यावर्षी आकर्षक असा शीशमहाल तयार करण्यात आला असून, रात्रीच्या प्रकाशझोतात त्याचे सौंदर्य खुलत आहे आणि अनेकजण हा शीशमहल पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सेट उभारून हे फन फेअर केले जाते.

यापूर्वी लाल किल्ला, लाल महाल, ताज महाल, गोल घुमट, म्हैसुर पॅलेस, सुवर्ण मंदिर, बिबी का मकबरा अशाप्रकारच्या ऐतिहासिक वास्तुंचे सेट या फन फेअरच्या माध्यमातून चिपळुणात उभारण्यात आले होते. २७वर्षे हा उपक्रम सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 29/Jan/2025