संगमेश्वर : आरवली घाटात मोरी खचली

संगमेश्वर : दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील व रस्ता पूर्ण झाल्यावर ओळखल्या जाणाऱ्या पनवेल कन्याकुमारी महामार्गाची रडकथा अजून न संपण्याच्या मार्गावर आहे. महामार्गावरील आरवली येथील घाटातील मोरी दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच खचल्याने केंद्रशासनाच्या कामा बद्दलच प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे.

चिपळूणमधील कोसळलेला पूल, रस्त्याला पडलेल्या भेगा आणि आरवली घाटातील खचलेली मोरी यामुळे सध्या कामाच्या दर्जाविषयी परिसरातून व प्रवाशांकडून जाव विचारला जात आहे. आरवली येथील ही मोरी बांधकामानंतर लगेचच खचली होती. वेगाने येणाऱ्या वाहने या ठिकाणी हेल्पाटत होती. एकंदर कामाचा दर्जा यामुळे कोकणवासीय आधीच त्रस्त आहेत. आरवली ते वाकेड हे काम गेले अनेक वर्षे विविध कारणांमुळे रखडलेले आहे.

पहिल्या ठेकेदाराने हे काम केले आहे. आता नव्या ठेकेदाराला हे पुन्हा रस्ता उकरून काम करावे लागत आहे. ब्रिटिशकालीन पूल अजून ही जसे च्या तसे आहेत. पण सध्या मुंबई गोवा हायवे च्या कामातील अनुभव गंभीर असल्याचे आरवली येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मंगेश परकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 01/Feb/2025