रत्नागिरी : ओबीसी मोर्चावेळीचे दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी

राजापूर : ओबीसी बांधवांच्या मागण्यांसाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये रत्नागिरीत मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी विनापरवाना मोर्चा काढल्याचा ठपका ठेवत रत्नागिरी पोलिसांनी १८ जणांवर गुन्हे दाखल केले. ते गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी ओबीसी जनमोर्चा संघटनेने निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे, अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी दिली.

शासनाला द्यावयाचे निवेदन ओबीसी जनमोर्चा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेडगे, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल आणि कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी नुकतेच पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिले. या वेळी चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तत्काळ कार्यवाहीसाठी पत्र पाठवत असल्याचे स्पष्ट केले आहे, असे बावकर यांनी सांगितले. ओबीसी बांधवांच्या मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी रत्नागिरी येथे मोर्चा काढण्यात आला होता. विनापरवाना मोर्चा काढण्यात आल्याचा ठपका ठेवून त्या वेळी रत्नागिरी पोलिसांनी १८ जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. याबाबत २०२१ मध्ये राज्य शासनाला गुन्हे मागे घेण्याबाबत ओबीसी जनमोर्चा संघटनेकडून करण्यात आली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 07/Feb/2025