खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहिरवलीनजीक दाभोळ व वाशिष्ठी Dabhol-Vashishthi खाडीत वाळूची चोरी सुरू असून, लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हे वाळू उत्खनन थांबले नाही तर ग्रामस्थ महसूल कार्यालयावर धडक मोर्चा काढतील, असा इशारा बहिरवली चौगुले मोहल्ला ग्रामपंचायत सदस्य शरीफ दाभोलकर यांनी दिला आहे.
कोरेगाव, संगलट मार्गावरून वाहतूक अवैध वाळू कर्जी गावच्या ठिकाणी सहा प्लॉटवर उतरली जात असून, त्या ठिकाणी साठा करण्यात येतो. तिथून खेड, दापोली व मंडणगड तालुक्यात बांधकामासाठी ही वाळू कोरेगाव, संगलट मार्गावरून रात्रंदिवस वाहतूक केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 02/Oct/2024