मेढे-साखरपा येथे अपघात; तिघेजण जखमी

रत्नागिरी : मुंबईहून खारेपाटण येथे जाणाऱ्या कारला संगमेश्वरातील मेढे-साखरपा येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ठाणे येथील पेडणेकर कुटुंबीयांतील तीनजण जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैजयंती शशिकांत पेडणेकर (वय ५०, रा. ठाणे), शोभा श्रीधर पेडणेकर (६५, रा. डोंबिवली-ठाणे) आणि विनोद शशिकांत पेडणेकर (२८, रा. ठाणे) अशी जखमींची नावे आहेत. विनोद पेडणेकर हे मंगळवारी रात्री ९.३० वा. कुटुंबियांसह मुंबईहून खारेपाटण येथे जात होते. ते साखरपा-देवरुख ते वाटूळ (ता. लांजा) या मार्गावरुन जात असताना मेढे-साखरपा येथील रस्त्यावर पुढे जाणारा डंपर अचानक थांबला. यावेळी पेडणेकर यांनी कारचा ब्रेक दाबला. मात्र, कार घसरुन डंपरला मागून धडक दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 13/Feb/2025