चिपळूण : ठेकेदारांच्या थकीत देयकांसंदर्भात येथील ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता अमरजित रामसे यांना जाब विचारला. फेब्रुवारीअखेर ते मार्चपर्यंत बिले अदा होतील, अशी ग्वाही श्री. रामसे यांनी ठेकेदारांना दिली. ठेकेदारांच्या थकीत देयकांबाबत चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या काही वर्षांपूर्वी ठेकेदारांची बिले नियमित अदा होत नाहीत. कोट्यवधी रुपयांची कामे करूनदेखील बिले अदा होत नसल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत आले आहेत. ठेकेदार हतबल झाल्याने चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेने बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता अमरजित रामसे यांच्यावर थकीत देयकांबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. यावर श्री, रामसे यांनी फेब्रुवारीअखेर ते मार्चपर्यंत बिले आदा होतील, अशी ग्वाही दिली. यावेळी ठेकेदार गणेश कांबळे, सुरेश पवार, केतन पवार, रणजित डांगे, मल्लू राठोड, स्वप्नील जाधव, विकास घाग, राहुल पवार, शिवाजी राठोड, प्रथमेश राठोड, शंकर पवार, राहुल गोपाळ आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 13/Feb/2025














