गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे मानेवाडी येथील श्री चंडिका मित्रमंडळाच्या वतीने सहाव्या पर्वातील गणपतीपुळे प्रीमियर लीग नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी गणपतीपुळे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी, माजी सरपंच बाबाराव माने, ज्येष्ठ नागरिक अरुण काळोखे, गणपती मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर, ग्रामपंचायत सदस्य संजय माने, पर्यटन व्यावसायिक परेश कुबडे, उमेश भन्सारी, कल्पेश सुर्वे, पत्रकार वैभव पवार उपस्थित होते. गेली पाच वर्षे या स्पर्धेचे अत्यंत दिमाखदार नियोजन केले जात असून, आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा लिलाव पद्धतीने खेळवण्यात येते. त्यामुळे यंदाही गणपतीपुळे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळाडू सहभागी झाल्याने ही स्पर्धा खास आकर्षण मानली जात आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 13/Feb/2025














