जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघटनेची रविवारी देवरुख येथे सभा

देवरुख : रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकारिणीची रविवार दि. १६ रोजी देवरुख येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कामगार सेना या संघटनेची ही दुसरी सभा आयोजित केली आहे. या ठिकाणी या सभेमध्ये जिल्ह्यातील कामगारांच्या मिळणाऱ्या सुविधेबाबत आढावा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन घेण्यासंदर्भात विशेष माहिती देण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजनही या सभेमध्ये होणार आहे. रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत संघटना अधिकाधिक बळकट करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करून त्यासाठी तालुका पातळीवर बैठका घेऊन मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या सभेसाठी जिल्हा स्तरावरील कार्यकारणी सदस्य तसेच प्रत्येक तालुक्यातील अध्यक्ष आणि सचिव यांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कामगार जिल्हाध्यक्ष कृष्णा होडे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 14/Feb/2025

Arihant 4