९० च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) सध्या चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने महाकुंभ येथे हजेरी लावली होती. इतकंच नाही तर तिथे तिने साध्वी जीवनाचा स्वीकार केला.
किन्नर आखाड्याने तिला ‘महामंडलेश्वर’ ही पदवी दिली. यानंतर अनेकांनी माधु महंतांनी याला विरोध केला. म्हणून ममताने या पदाचा राजीनामा दिला. पण आता ती पुन्हा ‘महामंडलेश्वर’ बनली आहे. व्हिडिओ शेअर करत तिने माहिती दिली आहे.
ममता कुलकर्णी व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “मी श्री यमाई ममतानंदगिरी… दोन दिवसांपूर्वी माझे पट्टागुरु लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर काहींनी चुकीचे आरोप लावले होते. यामुळे दु:खी होऊन मी मी राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही आणि मी जी गुरु भेट आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठींना दिली होती ती महामंडलेश्वर बनल्यानंतर जे छत्र, छडी आणि छवर असते त्यासाठी होती. आणि जे राहिलेली भंडारासाठी समर्पित केली होती. मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी मला पुन्हा या पदावर आणलं आहे. यापुढे मी माझं आयुष्य किन्नर आखाडा आणि सनातन धर्मासाठी समर्पित करेन.”
ममता कुलकर्णीने २५ वर्षांची तपस्या केल्याचं तिने याआधी सांगितलं आहे. २०१३ मध्ये तिची ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगिनी’ हे पुस्तक आलं होतं. तिने तेव्हाच बॉलिवूड, ग्लॅमरचं आयुष्य सोडलं होतं. आताही तिचा पुन्हा अभिनयात प्रवेश करण्याचा उद्देश नाही असंही ती म्हणाली. ममता आजही महामंडलेश्वर पदावर कायम असल्याने आता यावर साधु महंतांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 14-02-2025
