चिपळूण : परशुराम देवस्थानला २ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर

चिपळूण : तालुक्यातील परशुराम येथील भगवान श्री परशुराम देवस्थान परिसरातील विकासकामांसाठी सुमारे २ कोटी ४१ लाखांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. या निधीमुळे गेली काही वर्षे रखडलेल्या सांस्कृतिक भवनच्या कामाला गती मिळणार आहे. यासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने हा निधी मंजूर केला आहे.

परशुराम देवस्थान मंदिर परिसरातील सुशोभीकरणासह विविध भौतिक विकासाची कामे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत. गेली ५ वर्षे येथील विकासकामे निधीअभावी रखडली होती. खासदार सुनील तटकरे यांनी आठ ते दहा वर्षापूर्वी या देवस्थानसाठी १० कोटींचा निधी दिला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच चिपळूण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना चालना देण्याची भूमिका घेतली आहे. परशुराम देवस्थान हे कोकणातील महत्त्वाचे मंदिर आणि पर्यटनस्थळ असून, येथे भाविकांची सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे हे काम महत्त्वाचे आहे. शेखर निकम, आमदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 14/Feb/2025