खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी व कोकण विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार दि. १६ रोजी सकाळी ९.३० वा. ज्ञानदीप भडगाव – खोंडे येथे आयोजित करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमाशुल्क विभाग मुंबई (भारत सरकार) हे उपस्थित राहणार आहेत. या मार्गदर्शन शिबिराचा सर्व विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 14/Feb/2025














