लांजा : नव्याने पारित करण्यात आलेल्या फौजदारी कायद्याचे ज्ञान गावचे पोलिसपाटील यांना व्हावे, यासाठी लांजा पोलिस स्थानकाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व पोलिसपाटील यांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. संकल्प सिद्धी सभागृहात आयोजित या शिबिरात नवीन कायद्याची माहिती देण्यात आली.
भारतीय साक्ष, संहिता असे तीन नवीन कायदे पारित झाले आहेत, या कायद्याच्या मार्गदर्शनासाठी आयोजित या शिबिरासाठी तालुक्यातील ९० पोलिसपाटील उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील लॉ ऑफीसर सावंत तसेच लांजाचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, सहायक पोलिस फौजदार अरविंद कांबळे यांनी यावेळी नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात उपस्थित पोलिसपाटील यांना मार्गदर्शन केले.
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता असे तीन कायदे पारित झाले आहेत. ते कायदे १ जुलै २०२४पासून कार्यान्वित झाले आहेत. त्यानुषंगाने पोलिसपाटलांना मार्गदर्शन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 14/Feb/2025














