चिपळूण : तवसर येथे रूद्राई देवी मंदिराचा उद्घाटन सोहळा

चिपळूण : तालुक्यातील तवसर भाटे येथील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या पुरातन देवस्थान श्री रूद्राई देवी मंदिराचा उद्घाटन सोहळा १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी गणेश पूजन, वास्तुशांती, होमहवन, दुपारी सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित रहाण्याचे आवाहन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 14/Feb/2025

Shanti real estate 1