उबाठाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवी डोळस यांची पक्षातून हकालपट्टी

रत्नागिरी : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच ठाकरे गटाने गुरुवारी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक रवी डोळस यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच डोळस यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 15/Feb/2025

Happy journey english