शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे गोव्यात प्रशिक्षण

रत्नागिरी : शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील पदविकेच्या विद्यार्थ्यांनी गोव्यातील खेकडा संवर्धन केंद्रात प्रशिक्षण घेतले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालय शिरगाव येथे आहे.

तेथील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्रातील ३ विद्यार्थ्यांसाठी अॅक्वाकल्चर इंजिनिअरिंग विषयाअंतर्गत गोव्यातील संपद देसाई यांच्या मालकीच्या रिगल पेस्काटेक प्रायव्हेट लिमिटेड या खेकडा संवर्धन केंद्रात सखोल अभ्यासासाठी कार्यानुभव प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सहभागी विद्यार्थ्यांनी खेकडा संवर्धनाचे तंत्रज्ञान, तंत्रज्ञानासाठी लागणारी यंत्रसामग्री, फिल्ट्रेशन यंत्रणा आणि त्याचे व्यवस्थापन व मार्केटिंग यांचा अभ्यास केला. प्रशिक्षणामध्ये विपुल मोहिते, कुणाल बिडू व प्रसाद जाधव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना मत्स्य अभियांत्रिकी पदविकेचे माजी विद्यार्थी आणि रिगल पेस्काटेक कंपनीचे मॅनेजर शुभम पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी रिगल पेस्काटेक कंपनीच्या सहकार्याने मत्स्य अभियांत्रिकी पदविका संस्थेचे प्राचार्य डॉ. आशीष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 15-02-2025