रत्नागिरी : तालुक्यातील हातीस येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास करण्यात आली. सूरज पप्पू चव्हाण (वय २०, रा. मुरुगवाडी झोपडपट्टी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहायक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी संशयित हा हातीस येथील दर्गा परिसरात सार्वजनिक ठिकाणी आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारूचे सेवन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८५ (१) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 15/Feb/2025














