‘रत्नागिरी श्री मास्टर २०२५’ चे किरांबा गावातील प्रवीण कांगाणे मानकरी

दापोली : दापोली तालुक्यातील किरांबा गावातील प्रवीण कांगाणे हे शरीरसौष्ठव स्पर्धेत रत्नागिरी श्री मास्टर २०२५ चे मानकरी ठरले आहेत. आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी कावीळतळी चिपळूण येथे, रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने निवड चाचणी स्पर्धा २०२५ पार पडली. यात प्रवीण कांगाणे यांनी बाजी मारली आहे. या आधीदेखील कांगाणे यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दापोलीसह जिल्हाभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 15/Feb/2025