रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरीच्या २०२४-२५ बॅचमधील दोन विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील आदित्य गायकवाड आणि फैजा मुकादम या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून ही संधी मिळवली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, किरकोळ आणि डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असलेली भारतातील आघाडीच्या औद्योगिक समूहांपैकी एक आहे. अशा प्रतिष्ठित कंपनीत विद्यार्थ्यांना संधी देणे ही फिनोलेक्स अॅकॅडमीसाठी अभिमानाची बाब आहे.
फिनोलेक्स अॅकॅडमीच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट टीमने विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अॅप्टीट्यूड टेस्ट, इंटरव्ह्य प्रिपरेशन आणि टेक्निकल सेशन्स यासारख्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योग जगतात प्रवेशासाठी तयार केले जाते.
या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, अॅकॅडमीच्या मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि संपूर्ण अॅकॅडमीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. फिनोलेक्स अॅकॅडमी भविष्यातही विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 15/Feb/2025













