रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट सेल व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय सेल्स आणि मार्केटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कोका कोला बेव्हरेजिसचे मार्गदर्शक राहुल मिसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्लेसमेंट सेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी सक्षम करते. कार्यशाळेचे उद्घाटनाला प्र. प्राचार्या मधुरा पाटील उपस्थित होत्या. श्री. मिसाळ यांनी सेल्स आणि मार्केटिंग विषयावर पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. नंतर मिसाळ यांनी मुलाखतीमधील महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे, संवाद कौशल्य कसे विकसित करावे, मुलाखत देताना देहबोली कशी असावी, याबद्दल अधिक माहिती दिली. या मार्गदर्शनादरम्यान त्यांनी विविध उदाहरणे दिली. कार्यशाळेच्या शेवटच्या भागात यात सहभागी काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे देण्यात आली.
प्राचार्य मधुरा पाटील यांनी या वेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 15-02-2025














