Ratnagiri : थिबा पॅलेसमधील थ्रीडी मल्टिमीडिया प्रकल्प पूर्ण

रत्नागिरी : पर्यटनदृष्ट्या रत्नागिरी शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा थिबा पॅलेस येथील थ्रीडी मल्टिमीडिया शोचे काम पूर्ण झाले आहे. लेसरच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रोजेक्टरवरून थेट थिबा पॅलेसच्या २९ मीटर स्क्रीनवर राष्ट्रीय पुरुषांची गाथा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला जाणार आहे. उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कोकणातील पहिला प्रकल्प आहे. सुमारे २२ कोटी रुपये खर्च केलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच त्याची चाचणी घेऊन लोकार्पण केले जाणार आहे.

थ्रीडी मल्टिमीडिया शोचे काम चेन्नई येथील स्टुडिओ या कंपनीला दिले आहे. या कंपनीचे तज्ज्ञ आनंद कश्यप यांनी याबाबत माहिती दिली. थिबा पॅलेसची समोरची बाजू या शोची स्क्रीन आहे. सुमारे २९ मीटर रुंदीच्या स्क्रीनवर हा शो दिसणार आहे. त्यासाठी सव्वा ते दीड कोटीचे ५ अत्याधुनिक प्रोजेक्टर उभारण्यात आले आहेत. ३५० लोकांची बसण्याची व्यवस्था केली आहे. त्याच्याभोवती आणि समोर एकूण १८ स्पीकर आहेत. हे स्पीकर वॉटरप्रुफ आहेत. त्यातील एका स्पीकरची किंमत सुमारे १ लाख आहे. २० कोटी या प्रकल्पावर खर्च करण्यात आले आहेत. कोटीचे सिव्हिल वर्क करण्यात आले आहे. काम पूर्ण झाले असून, लवकरच त्याची चाचणी होणार आहे.

थ्रीडी मल्टिमीडिया शोचे तांत्रिक काम पूर्ण झाले आहे. अर्धा तास ते पस्तीस मिनिटांचा शो असणार आहे. सर्व अत्याधुनिक यंत्रणा वापरली असून, पर्यटनवाढीला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. – आनंद कश्यप, चेन्नई येथील स्टुडिओ कंपनीचे तज्ज्ञ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 15/Feb/2025