नाणीज येथे रमाई जयंतीनिमित्त अभिवादन सभा

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील नालंदा बुद्ध विहार येथे त्याग मूर्ती माता रमाई यांची १२७ वी जयंती महिला मंडळाचे अध्यक्ष प्रतिभा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तर सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका सुलभा कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन आम्रपाली महिला मंडळ व नालंदा बौद्धजन मंडळ स्थानिक व मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना व धार्मिक पूजापाठाने करण्यात आली. यावेळी गावचे पोलिस पाटील व मंडळाचे उपाध्यक्ष नितीन कांबळे व प्रमुख अतिथी सुलभा कांबळे यांनी, त्यागमूर्ती माता रमाई यांनी शेण, गोऱ्या थापून अतिशय परिश्रम घेऊन आपला संसार चालविला, अनेक दुःखद प्रसंग झेलले. पण त्यांच्या दुःखाची झळ पती परदेशी उच्च शिक्षणाच्या पदव्या घेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसू दिली नाही. त्यांच्या शिक्षणात अडथळा आणला नाही, अशा विविध प्रसंगाचं सविस्तर वर्णन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 15/Feb/2025

Happy journey english