दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्त २४ फेब्रुवारी रोजी सहभोजन आणि सहभजन

रत्नागिरी : भक्तीभूषण दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने २४ फेब्रुवारी रोजी रॅली, सहभोजन आणि सहभजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी श्री. कीर यांच्यासह माजी जिल्हा माहिती अधिकारी आणि समाज नेते प्रभाकर कासेकर, कार्यवाह चंद्रहास विलणकर, माजी कार्यवाह दिलीप भाटकर, सदस्य सुहास धामणसकर, आदेश भाटकर, कौस्तुभ नागवेकर उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना श्री. कीर म्हणाले, रॅलीची सुरुवात सकाळी ९ वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरापासून होईल. त्यानंतर ही रॅली प्रमोद महाजन क्रीडा संकुल जवळून आठवडा बाजार येथून एसटी बसस्थानक, जयस्तंभ ते मारुती मंदिर अशी मार्गक्रमणा करेल. त्यानंतर मारुती मंदिर येथून जयस्तंभ रामआळी मार्गे पतितपावन मंदिरापर्यंत येऊन समाप्त होईल. रॅलीनंतर पतितपावन मंदिरात बांधकाम व्यवसायिक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट भजनी बुवा अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सत्कार केला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:48 PM 17/Feb/2025