मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेड ते तळेकांटेदरम्यान धुळीचे साम्राज्य

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आंबेड ते तळेकांटे दरम्यान धुळीचे साम्राज्य पसरले आहे. छोट्या वाहनचालकांना समोरील काही दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

काही ठिकाणी काँक्रीटचा पक्का रस्ता झाला असून जेथील रस्ता झाला आहे, त्याच्या शेवटी काही ठिकाणी पाच ते सहा इंचाचा खड्डा आहे. तेथे गाड्या आदळत आहेत. याचा फटका गाडीत बसलेल्या प्रवाशांना बसत आहे. त्याशिवाय गाडीचे नुकसानही होत आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जात आहे. मार्गावर पडलेली खडी तत्काळ बाजूला करावी, मातीवर दिवसातून दोन वेळा पाणी मारावे आणि जेथे रस्ता तुटला आहे, तेथे काँक्रीट घालावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 19-02-2025