रत्नागिरी : जिल्हा परिषदेतर्फे पाणी गुणवत्ता कार्यशाळा

रत्नागिरी : पिण्याची पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची असते, असे विधान जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी जि.प. तर्फे आयोजित पाणी गुणवत्ता कार्यशाळेत केले. पाणी गुणवत्ता अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, केंद्रातील कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन हॉटेल विवा एक्झिक्यूटिव्ह येथे करण्यात आले होते.

यावेळी कीर्ती किरण पुजार यांनी जल जीवन मिशन अंतर्गत विविध पैल्युंवर भाष्य केले. जनजीवन मिशन अंतर्गत हस्तांतरण प्रक्रिया, पाणी गुणवत्ता विषयी विविध स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या, स्त्रोत बळकटीकरण याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्रकल्प संचालक व जि. प. चे उपमुख्यकार्यकारी (ग्रामपंचायत विभाग) राहुल देसाई यांच्यासह तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी हर घर जल घोषित गावांसाठी शासनाकडून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांचेकडून आलेले शुभेच्छापर प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य संसाधन केंद्र जी.पी.एस. फाउंडेशन लखनऊ यांनी केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 20/Feb/2025