जालना : जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. परीक्षा केंद्राबाहेर अनेक तरुणांनी हुल्लडबाजी केल्याचं पाहायला मिळालं आहे.
आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे.

या पहिल्याच दिवशी कॉपी पुरवण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
आज दहावीचा मराठीचा पेपर होता. या मराठीच्या पहिल्याच पेपरला केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी आणि हुल्लडबाजी पाहायला मिळाली.
जालन्यातील तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे.

दरम्यान, परीक्षा केंद्राबाहेर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांमुळं आतमध्ये परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना बाहेरील गोंधळाचा त्रास सहन करावा लागला.
पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याचा प्रकार देखील जालना जिल्ह्यात घडला आहे.
जालना जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे, जालना जिल्ह्यात 102 परीक्षाकेंद्रावर जवळपास 32 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत.
शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती मात्र कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळतोय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 21-02-2025
