रत्नागिरी : जिल्हास्तरीय संरक्षण समितीची २४ फेब्रुवारी रोजी मासिक बैठक

रत्नागिरी : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी, दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

माजी सैनिकांच्या कौटुंबिक संरक्षणासंदर्भात तक्रारी असल्यास या बैठकीस विहित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 21-02-2025