रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव आजपासून

रत्नागिरी : जिल्हा ग्रंथोत्सव चे आयोजन २२ व २३ फेब्रुवारी या कालावधीत शासकीय विभागीय ग्रंथालय येथे होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या प्रयोत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.

या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी, जिल्हाधिकारी एम. देवेदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीतकिरण पुजार, पेलिस अधीक्षक धनंजय कुतकाणी, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदी उपस्थित राहणार आहेत

साहित्यिकांच्या या मांदियाळीमध्ये विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद संमेलनाचे आयोजन केले आहे. या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथप्रदर्शन ग्रंथविक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये शासकीय ग्रंथागार, साहित्य अकादमी, दिल्ली व मुंबई, नैशनल बुक ट्रस्ट दिल्ली व मुंबई, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडल, कोल्हापूर शाखा आणि पुष्पातील प्रकाशक व विक्रेते यांची ग्रंथदालने लावण्यात येणार आहेत.

ग्रंथोत्सवाच्या सुरवातीला उद्घाटनाच्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता प्रधपूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन केले आहे. ही ग्रंथदिंडी की. जी. पी. एम. हायस्कूल येथून निघणार असून, भारतरान डॉ. वाचासाहेब आंबेडकर पुठाळामार्गे शासकीय विभागीय ग्रंथालय, जयस्तंभ येथे येईल, दूसरी १२.३० वाजता “गोडी वाचनाची काया पुस्तकांची” या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे.

रविवारचे परिसंवाद

२३ रोजी सकाळी ११ वाजता ‘मसाठी राज्यभाषा असता ज्ञानभाषा करू’ या विषयावर मराठी भाषाप्रेमी वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी परिसंवाद आहे. वा सत्रामध्ये मुख्याध्यापक, कोळंबे जिल्हा परिषद शाळेतील डॉ. सदानंद आग्रे आणि स्वामी स्वरूपानंद विद्यालयातील शीतल सामंत हे सहभागी होणार आहेत. दुपारी अडीच वाजता निमंत्रित कवीचे काव्यसंमेलन व त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ कवयित्री सुनेत्रा जोशी या काव्यसंमेलन व समारोपाचे अध्यक्षस्थानी आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 22/Feb/2025