दापोली : दापोली नगर पंचायतीच्या विषय समिती निवडणुकीत शिंदेंच्या सेनेने दोन सभापती पद आपल्याकडे घेतले असून, मित्र पक्ष भाजपकडे एक समितीचे सभापती पद दिले आहे. ठाकरेंच्या सेनेचे पाच नगरसेवक फोडल्यानंतर शिंदेंच्या सेनेने विरोधकांना कोंडीत पकडून ही खेळी केली आहे.
या विषय समिती निवडी वेळी एका रात्रीत मोठ्या वाटाघाटी घडल्या असून, या समिती निवडी वेळी उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक अनुपस्थित दिसले. त्यामुळे तूर्तास शिंदे गटाने दापोली नगर पंचायतीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ममता मोरे या स्थायी समिती अध्यक्ष आणि सभापती आहेत. खालिद रखांगे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम या समितीचे सभापती पद आहे.
भाजपच्या जया साळवी यांचेकडे स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पद देण्यात आले आहे. शिंदेंच्या सेनेच्या प्रीती शिर्के या पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापती झाल्या असून नव्याने ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या अश्विनी लांजेकर यांना महिला व बालकल्याण समिती सभापती पद देण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 22/Feb/2025
