खेड : आवाशीत विहिरीत पडलेल्या प्रौढासह कुत्र्याला जीवदान

खेड : तालुक्यातील आवाशी गावात शुक्रवारी रात्री १०.४० ते २.३० या दरम्यान एक प्रौढ व्यक्ती आणि कुत्रा विहिरीत पडले होते. त्यांना वाचविण्यात लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाला यश आले आहे.

आवाशी गावातील ८० फूट खोल विहिरीत एक व्यक्ती व कुत्रा पडला. त्यांना बाहेर काढण्यासाठी लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले.

अग्निशमन दलाच्या टीमने दोरांच्या सहाय्याने विहिरीत उतरून दोन तासांच्या प्रयत्नांनंतर व्यक्तीसह कुत्र्याला सुखरूप बाहेर काढले. मोहिमेत उप अग्निशमन अधिकारी ए. जी. सरवदे, प्रमुख अग्निशमन विमोचक व्ही. एन. देसाई आणि एस. एस. कुलये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यंत्र चालक एम. एस. मोरे आणि अग्निशमन विमोचक एम.डी. पाचांगणे, व्ही. व्ही. कारंडे व पी. आर. कांबळे यांनी सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 24/Feb/2025