चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय सिझन बॉल व पहिल्यांदाच टर्फ विकेटवरील क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, यास्पर्धेत प्रदीप स्पोर्ट्स क्लब मुंबई संघाचा पराभव करत मालवण कट्टा संघाने विजेतेपद पटकावले.
आमदार शेखर निकम, तसेच प्रथम दर्जाचे क्रिकेटपटू धीरज जाधव यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला गौरविण्यात आले. विजेत्या संघाला दोन लाख रुपये रोख, चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी आ. शेखर निकम म्हणाले की, दशरथ दाभोळकर यांनी सिझन क्रिकेटला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी मोठे प्रयत्न केले.
असोसिएशनचे अध्यक्ष दाभोळकर यांना साथ देणाऱ्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचेही आभार मानले. खासदार सुनिल तटकरे यांनी मैदानाच्या सुसज्जतेसाठी आर्थिक मदतीची ग्वाही दिली आहे. कंपन्यांमधील सीएसआरमधून त्यांच्या माध्यमातून खेळासाठी निधी मिळवून देऊ, असेही आ. निकम म्हणाले. पुढील वर्षी पवन तलाव मैदानावर ही स्पर्धा होईल, तेव्हा हे मैदान सुसज्ज असेल. हिरवेगार दिसेल, असे सांगून सचिन कोळी व त्यांचे सहकारी यांनी पीच क्यूरेटर म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले. क्रिकेटपटू धीरज जाधव यांनी खूप चांगले मैदान चिपळूणला लाभले आहे. याआधी पन्नास खेळाडू होते, असोसिएशनने कामाला सुरुवात केली आणि आज दिडशे खेळाडू घडले आहेत, असे सांगून त्यांनी असोसिएशनच्या कामाचे कौतुक केले.
या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयंदथ खताते खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, दिशा दाभोळकर, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, ठेकेदार योगेश पवार, समालोचक सचिन कुलकर्णी, जिल्हा बँक संचालिका दिशा दाभोळकर, डॉ. मंगेश वाजे, ठेकेदार रविंद्र कुलकर्णी, माजी सभापती पूजाताई निकम, देवरुखचे बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, अदिती देशपांडे, ओंकार भुरण यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पंच निनाद सहस्त्रबुद्धे आणि बोंडकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर षटकार खेचणाऱ्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सूत्रसंचालन शाहीर खेरटकर यांनी केले, तर समालोचनाची जबाबदारी प्रशांत आदवडे, बाबल्या जाधव, इब्राहिम सरगुरोह यांनी सांभाळली.
वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी
अंतिम सामन्याचा समनावीर अजित यादव ठरला. या स्पर्धेत चतुर्थ संघ ठरला मुंडे स्पोर्ट, मुंबई, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला पुणे पोलिस, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रज्जा मिर्झा (मालवण कट्टा), एकाच सामन्यात सात विकेट घेणारा उत्कृष्ट गोलंदाज कुशाग्र गुप्ता (मालवण कट्टा), उत्कृष्ट पलंदाज ह्दय घाडगे (मालवण कट्टा), मालिकावीर सत्यन चौधरी (प्रदीप स्पोर्टस्) ठरला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 24/Feb/2025
