खेड : गुणदे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार

खेड : तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक वापराच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत रॅली काढून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले.

सरपंच रवींद्र आंब्रे, उपसरपंच रूणाली आंब्रे, ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ रॅलीत सहभागी झाले होते. प्लास्टिकचा वापर टाळून होणारे प्रदूषण व आरोग्याला पोहचणारा धोका या बाबत ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या शंकांचेही निरसन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:20 PM 24/Feb/2025