गुहागर : गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी दिले अजगराला जीवदान

गुहागर : एक अधिकारी म्हणून प्रशासनाच्या कामाचा डोलारा यशस्वीरीत्या सांभाळून आपली सर्पमित्र ही ओळख कायम राखण्याची भूमिका सध्या गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे करत आहेत. नुकतेच कुडली येथे त्यांनी एका अजगराला जीवदान दिले आहे.

कुडली गावातील कार्यक्रमातून येत असताना पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी कदम यांच्या निवासस्थानी आलेल्या अजगर जातीच्या पिल्लाला गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी यशस्वीपणे पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

सुरुवातीपासून साप पकडण्याची आवड असलेल्या शेखर भिलारे यांनी यापूर्वी देखील अनेक सापांना जीवदान दिले आहे. प्रशासनात एका पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी काम करत असतानादेखील भिलारे यांनी आपला सर्पमित्र म्हणून असणारा छंद जोपासला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 25/Feb/2025