रत्नागिरी : दोन एसटींच्या धडकेत पाच प्रवासी जखमी

पावस : पावस-पूर्णगड मार्गावरील कुर्धे फाटा येथे एका एसटी बसला पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने धडक दिल्याने चार ते पाच प्रवासी जखमी झाले. यामध्ये एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सायंकाळी पाचनंतर रत्नागिरी आगरातून सुटणारी रत्नागिरी-गावखडी ही एसटी कुर्धे फाटा येथे प्रवाशांना उतरवण्यासाठी थांबली

होती. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या रत्नागिरी-अणसुरे या एसटीवरील चालकाचा ब्रेक न लागल्याने उभ्या असलेल्या एसटीवर पाठीमागून आदळली. यामध्ये रत्नागिरी-अणसुरे गाडीचे नुकसान झाले आहे. या गाडीतील चार ते पाच जणांना किरकोळ मार लागला असून त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 28/Feb/2025