दापोलीत अवैध दारू विक्री

दापोली : तालुक्यातील गावतळे ते शेरवली मार्गारीलर एका धाब्यावर गावठी, देशी व विदेशी दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या ठिकाणी मद्यपी लोकांची वर्दळ सतत सुरू असते. या भागात शैक्षणिक संस्था असल्याने येथील विद्यार्थ्यांना तळीराम फिरताना नेहमीच दिसतात. दाट लोकवस्तीत सुरू असलेल्या या गैरप्रकारांमुळे अवैध दारू विक्री बंद करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 28/Feb/2025

Gadre1