संगमेश्वर : संगमेश्वर पोलिस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) शिवप्रसाद पारवे यांची विविध क्षेत्रांतील लोकांनी भेट घेतली. काही महिन्यांपूर्वी संगमेश्वर पोलिस ठाण्यात रुजू झालेले पोलिस निरीक्षक अमित यादव यांची रत्नागिरी येथे आर्थिक गुन्हा शाखेत बदली झाली. त्यांच्या जागी पोलिस उपअधीक्षक पारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी काही दिवसांपूर्वी येथील पोलिस ठाण्याचा कार्यभार हाती घेतला आहे. यापूर्वी पहिल्या महिला पोलिस निरीक्षक म्हणून स्मिता सुतार यांनी काम पाहिले होते. नुकतेच रुजू झालेले पारवे हे पोलिस ठाण्यातील पोलिस उपअधीक्षक आहेत. आजपर्यंत पोलिस निरीक्षक यांच्या व्यवस्थापनाखाली येथील पोलिस ठाण्याचा कारभार चालत होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 28/Feb/2025














