दापोली : दापोली नगर पंचायतीचे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्यासह एकूण ९ नगरसेवकांनी २८ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी हा पक्षप्रवेश झाला आहे. या नगरसेवकांनी १४ नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार केला असून, नगराध्यक्ष
पदावर देखील दावा करण्यात येणार आहे.
आता दापोली येथील नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष ममता मोरे याच एकमेव उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये राहिल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 AM 01/Mar/2025














