चिपळूण : धामेलीत रस्ता, संरक्षण भिंत कामाचे भूमिपूजन

चिपळूण : तालुक्यातील धामेली येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून रस्ते, पाखाडी, संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध झाला. या मंजूर कामांचे भूमीपूजन आ. शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आ. निकम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, पांडुरंग माळी, बाबू वाजे, प्रभाकर सैतवडेकर, रघु ठसाळे, अनिल भोजने, बाळा तटकरे, संदीप गायकर, एकनाथ ठसाळे धामेली ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 01/Mar/2025

Infigo Eyecare