व्यवहारात इंग्रजी शब्दांचा कमीत कमी वापर करा : डॉ. आशा जगदाळे

रत्नागिरी : इंग्रजी शब्दांचा कमीत कमी वापर करा. मराठीचा शब्दसंग्रह वाढवायचा असेल तर पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी केले.

येथील नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, मराठी विभागाचे प्रा. सचिन टेकाळे, प्रा. मेघना कोल्हटकर, प्रा. रूपाली तावडे यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 01/Mar/2025

Shanti 3