राजापूर : पाचल, खारेपाटणमधील स्वच्छता मोहिमेत ३६ टन कचरा संकलित

राजापूर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या राजापूर, लांजा तालुक्यांतील श्री समर्थ बैठकीतील सदस्यांनी पाचल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सुमारे साडेआठशेहून अधिक श्री सदस्य सहभागी झालो होते. यामध्ये सुमारे ३६ टनांहून अधिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

प्रतिष्ठानच्या भालावली, गावडे आंबेरे, कोदवली, रिंगणे, लांजा बैठकीतील तब्बल ३०५ श्री सदस्यांनी पाचल येथील आठवडा बाजार परिसर, शासकीय गोदाम परिसर, जवळेथर रोड रस्ता ते सरस्वती विद्यामंदिर या परिसराची स्वच्छता केली. खारेपाटण येथे राजापूर, नाणार, सागवे, अणसुरे, बाकाळे, केळवली आणि दोनिवडे विभागातील तब्बल ५४० श्री सदस्यांनी ग्रामपंचायत परिसर, पोलिस चेकपोस्ट ते रामेश्वरनगर हायवे रोड, आठवडा बाजार रस्ता, चव्हाटा परिसर, स्मशानभूमी परिसर, आठवडा बाजार रोड ते एसटी डेपो परिसर रस्त्यासह सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. पाचल येथील स्वच्छता मोहिमेत सोळा टन, तर खारेपाटण येथील स्वच्छता मोहिमेत २० टन असा मिळून तब्बल ३६ टन कचरा संकलीत झाला. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 03/Mar/2025