दापोली : भारतातील ५१ समुद्री मत्स्यप्रजाती लोप पावत असतानाच वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडियाच्या (इस्त्रा) पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी-उंटबर सागरी परिक्षेत्रात शार्क (मुशी) आणि गिटारफीश, पाकट प्रजाती मिळण्याचे ठिकाण म्हणून नामांकित केले आहे.
भारतातील काही समुद्री मत्स्यप्रजात्ती विलुप्तीच्या उंबरठ्यावर येऊन उभ्या राहिल्या आहेत. म्हणूनच आययुसीएनच्या शार्क स्पेशालिस्ट ग्रुपने आजवर १२५ क्षेत्रांना इस्त्राचे ओळख दिली आहे. त्यामध्ये आता केळशी-उंटबर आणि मालवणच्या सागरी परिक्षेत्राचा समावेश केला आहे. इस्त्रा ची प्रामुख्याने बंदरावर वाहून आलेल्या शार्क, पाकट आणि गिटारफिशची संख्या पाहून निरीक्षणं घेते.
मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये अनावधानाने अडकलेले हे जीव मच्छीमारांकडून बंदरांवर आणले जातात. कोणत्या बंदरावर असे जीव वाहून आल्याची संख्या जास्त आहे, याचे सर्वेक्षण करून त्याची ओळख पटवण्याचे काम इस्त्रा करते.
दापोली तालुक्यातील केळशी-उंटवर या क्षेत्राची ओळख ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया “च्या टीमने केली आहे. मच्छीमारांच्या पारंपरिक ज्ञानाचा व त्यांच्याकडून सद्यःस्थितीत होणाऱ्या माशांच्या पकडीचा अंदाज इस्त्राने घेतला. त्यासाठी मच्छीमारांसोबत सविस्तर चर्चा करून सोनेरी व लांजा या प्रजातीची प्रजनन स्थळे व भक्ष्य उपलब्ध असलेल्या स्थळांचे व कालावधीचे आकलन केले गेले. त्यामुळे त्यांनी या जागेची निवड करून तसा प्रस्ताव “आययुसीएन “च्या “शार्क स्पेशालिस्ट ग्रुप”ला पाठवला.
हा प्रस्ताव मान्य करून ग्रुपने या क्षेत्राला इस्त्रा क्षेत्र म्हणून नामांकित केले आहे. केळशी-उटेंबर येथे “शार्पनोज गिटारफिश ऑफि “वाइडनोज गिटारफिश” या दोन प्रजाती प्रामुख्याने आढळून आल्या
या दोन्ही प्रजाती “भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित आहेत. म्हणजेच त्यांना वाधाएवढे संरक्षण आहे. तसेच “आयखुसीएन’ व्या लाल यादीत या दोन प्रजातींचा समावेश “नष्टप्राय” प्रजातींच्या यादीत करण्यात आला आहे. मालवणमध्ये ‘लॉगहेड इंगल रे’ हो ‘संकटग्रस्त’ आणि ‘वाइडनोज गिटारफिश ही ‘नष्टप्राय’ प्रजात आढळून आली आहे.
इस्त्रा ही जमिनीवरील महत्वाच्या पक्षीक्षेत्रांप्रमाणे (IBA) व मुख्य जैवविविधता क्षेत्रांप्रमाणे (KBA), पर्यावरणीय व जैवशास्त्रीयदृष्ट्या मूल्यवान सागरी क्षेत्र आहेत. इस्त्रा क्षेत्र कायद्याने प्रमाणित नसली तरी ही क्षेत्रे अत्यंत महत्वाच्या सागरी परिसंस्था दर्शवतात. इरवा अशी नमूद केलेली क्षेत्रे, तेथील प्रजातींच्या वैज्ञानिक संशोधन व संवर्धनाच्या प्रयात्नांसाठी मार्गदर्शक ठरतात. केळशी-उटंकर इस्त्रा क्षेत्र हे सुनेरी व लांजासाठी ओळखले गेले आहे. – अलिस्सा बारनेस, मॅनेजर, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया
शार्क माशांच्या ज्या प्रजाती आहेत म्हणजे पाकट आणि मुशी ही मासळी किनाऱ्यालगत सापडत नाहीत. ही मासळी जास्तीत जास्त खडकाळ भागात प्रजननासाठी येते. त्यामुळे आंजर्लेच्या पुढे म्हणजे उटंबर तसेच केळशी या भागांमध्ये आढळून येतात. पूर्वी किनारपट्टीला जाळी लावून मासळी मारण्याचा प्रकार चालायचा; परंतु हर्णे बंदरामधून अशा पद्धतीने किनारपट्टीला जाळी लावून मासेमारी करणे बंद केले आहे. हर्णे बंदरातच बऱ्यापैकी निबंध आहेत. ही मासळी साधारण २० ते २५ नॉटिकल मैलाच्या अंतरावर सापडते. ही मासळी झुंडीने असते. हर्णे बंदरातील एकाही ट्रॉलरवर या मासळीची मरतुकीची जाळी वापरली जात नाही. मुशी आणि पाकट या प्रकारची मासळी फार कमी प्रमाणात मिळते. पाकट मासळीला वाघळं म्हणतात- – महेंद्र चौगळे, सदस्य, हर्णे मच्छीमार संघटना
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 03/Mar/2025














