रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव-शिवरेवाडी येथील रस्त्याचे रखडलेले डांबरीकरण शिमगोत्सवापूर्वी पूर्ण व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी धावपळ सुरू झाली आहे. ग्रामस्थांनी सार्वजिनक बांधकाम उत्तर विभागाचे अभियंता अमोल ओटीवणेकर यांची भेट घेतली. शिरगावमधील सुमारे ७०० मीटरच्या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे.
शिवरेवाडीतील रस्त्याच्या कामाचा आदेश दीड वर्षापूर्वी देण्यात आला होता; परंतु ठेकेदाराने कामाला सुरुवातच केलेली नाही. आता गावागावांतील पालख्या गावप्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर पडणार आहेत. शिवरेवाडीतील ग्रामदेवतेची पालखीसुद्धा बाहेर पडणार आहे; परंतु शिवरेवाडीतील सुतारवाडीपर्यंतच्या रस्त्याची फारच दयनीय अवस्था आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्याचे डांबरीकरण करण्याची विनंती केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 04/Mar/2025














