चिपळूण : चिपळूण शहरातील ‘भर वर्दळीच्या ठिकाणी असलेली एक पान टपरी फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या शहरातीलच दोन तरुण भुरट्या चोरट्यांना टपरी चालकाने रंगेहाथ पकडून त्यांचे थोबाड रंगविल्याच्या घटनेची चर्चा शहरात सुरू आहे. या बाबत अधिक माहिती घेतली असता संबंधित भुरट्यांनी ही टपरी दोन ते तीनवेळा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती काही लागले नाही. परंतु टपरी मालकाने त्यांना पकडण्यासाठी थेट टपरीतच मुक्काम ठोकल्यामुळे दोन भुरटे अलगद तावडीत सापडले.
शहरातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज चौकानजिक असलेल्या एका कोपऱ्यावरील हॉटेलच्या मागील बाजूस ही पान टपरी असून, ही टपरी फोडण्यासाठी शहरातीलच चांगल्या कुटुंबातील दोन तरूणांनी चोरी करताना सापडण्यापूर्वी तीन-चारवेळा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती आवश्यक काही ऐवज लागला नाही. त्यामुळे हे चोरटे पुन्हा टपरी फोडणार असा अंदाज बांधून टपरी चालकाने चार दिवस टपरीतच रात्रीच्यावेळी मुक्काम ठोकला. त्यांचा हा अंदाज खरा ठरला आणि या दोघांना त्याने पकडले.
बुरखधारी चोरांचा वावर
मागील आठवड्यात काविळतळी परिसरात दोन अज्ञात बुरखेधारी तरुण चोरट्यांनी शिरकाव केल्याचा प्रकार उघड झाला आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी यांच्या बंगल्यानजीक दोन बुरखेधारी अज्ञात चोरटे वावरत असल्याचे एका तरुणाने आपल्या घरातून पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 07/Mar/2025














