रत्नागिरी : Womens Day| जिल्हा, तालुका व गाव स्तरावर आज जि.प.तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : पाणी व स्वच्छतेबाबत गावस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त यथोचित सन्मान करून त्यांचे कार्य प्रेरणादायी होण्याच्या दृष्टीने गावच्या गावसभेमध्ये व तालुका स्तरावरील सभेमध्ये सन्मान करावा. याबाबत सर्व महिलांनी आपल्या गावासाठी सक्रिय काम करून गावे आदर्शवत करण्याबाबतचे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी केले आहे.

८ मार्च रोजी संपूर्ण देशात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त पाणी व स्वच्छता विभाग, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व ग्रामपंचायतीमध्ये अंमलबजावणी सहाय्य संस्था म्हणून निवड झालेले ग्राम संघातील सर्व महिलांची जागतिक महिला दिनानिमित्य महिलांची विशेष धाव (वॉश रन) आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महिला, बचत गटातील उमेद, किशोरवयीन मुली/विद्यार्थीनी, स्वच्छता कर्मचारी, पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य आणि समुदयातील प्रभावशाली लोकांचा समावेश करून पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

या निमित्ताने महिलांचा मेळावा घेऊन विविध विषयावरती चर्चा करावी असे निर्देश राज्यस्तरावरून दिल्याबाबतची माहिती पाणी व स्वच्छाता विभागाचे प्रकल्प संचालक राहुल देसाई यांनी दिली.

गाव व तालुकास्तरावरील विशेष उपक्रम
पाणी व स्वच्छतेचे व्यवस्थापन करणारे स्वयंसेवी गट, नेते, किशोरवयीन चॅम्पियन, पाणी गुणवत्ता बाबत देखभाल दुरुस्ती करणाऱ्या महिला आणि वॉशच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व महिलांच्या सहभागाबाबत चर्चा, मेळावे घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वॉश रनचे आयोजन करणे, महिलांचा सन्मान, ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन, जिल्ह्यात किमान एक महिला अनुकूल आदर्श ग्रामपंचायती संबंधित मॉडेलची उभारणी करणे, स्थानिक महिला नेतृत्वासोबत गट चर्चा किंवा कथाकथन सत्रे आयोजित करणे. पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रातील महिलांच्या भूमिकेविषयी पथनाट्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे. मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन तसेच एफटीके किट चाचणी आणि इतर वॉश संबधी नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे, तथा स्वयं सहाय्य बचत गटाच्या या नेतृत्वाखालील पाणी व स्वच्छता क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रदर्शन करणारे मेळावे आयोजित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 08/Mar/2025