गुहागर तालुका शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता

गुहागर : कनिष्ठ महाविद्यालय अबलोली येथे गुहागर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाची नुकतीच सांगता झाली. सदर कार्यक्रमाला केंद्र संचालक शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाग अबलोली चे श्री विश्वास खर्डे साहेब, विषय शिक्षक परमेश्वर लांडे, साखरे सर ,मोहिते मॅडम, तज्ञ मार्गदर्शक श्री पिसाळ सर ,रणे सर, माणगावकर सर, जाधव सर ,पाटील सर, प्रदीप जाधव सर, प्रताप दिसले सर, दीपक रामाने सर ,आखाडे सर, किनोळकर सर ,वाकडे सर ,प्रभू हंबर्डे सर, मनोज पाटील सर शिक्षक नेते कैलास सर,, संघाचे तालुकाध्यक्ष रवींद्र कुळे शिक्षक नेते चंद्रकांत पागडे सर व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते .त्यावेळी घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

प्रभू हंबर्डे सर यांचे मार्गदर्शनाखाली काहूत ऍक्टिव्हिटी रिझल्ट वर्ग प्रथम विकास बलशेठवार, द्वितीय सविता देशमुख ,तृतीय प्रियंका कोष्टी ब वर्ग प्रथम सचिन लबडे, द्वितीय कल्पेश धावडे ,तृतीय प्रमोद साळवी तिसरा वर्ग प्रथम दत्ताराम धनवडे ,द्वितीय आशुतोष चितळे ,तृतीय विशाल जोशी ड वर्ग प्रथम कुरेशी मूत्साह, द्वितीय मनोज शिंदे ,तृतीय मंगेश दवंडे र्व तज्ञ मार्गदर्शक यांचा प्रशिक्षणार्थ्यांमार्फत मार्फत भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 08-03-2025