रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिला सशक्तीकरण अभियान जिल्हास्तरीय मेळावा ७ ऑक्टोबर रोजी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी कळविले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबधित राबविण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहचविण्याकरिता पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात ५ हजार महिलांचा महिला सशक्तीकरण व सक्षमीकरणाचा एक मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:13 04-10-2024