आरवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रत्नागिरी जिल्ह्यात सदस्य नोंदणी सुरु आहे. अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हा मार्फत मंगळवार ११ मार्च पासून सदस्य नोंदणी मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
सदस्य नोंदणी शुभारंभ मंगळवार ११ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता आमदार शेखर निकम राष्ट्रवादी संपर्क कार्यालय चिपळूण येथे आ. शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, चिपळूण तालुकाध्यक्ष अबू ठसाळे, संगमेश्वर तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी अल्पसंख्याक सेलचे सर्व तालुकाध्यक्ष, सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अल्पसंख्याक सेल जिल्हा सरचिटणीस जमालुद्दीन बंदरकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 10/Mar/2025












