मंडणगड : पालघरमधील रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

मंडणगड : राज्य शासनाच्या पंचवीस पंधरा योजनेच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातील पालघर येथील गाव अंतर्गत रस्त्याच्या कामाकरिता पाच लाखांचा निधी मंजूर झाल्याने रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, विभागप्रमुख दीपक मालुसरे, माजी विभाग प्रमुख गजानन तांबुटकर, माजी सभापती अमिता शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, सरपंच साक्षी खांडेकर, माजी पोलीस पाटील गजानन म्हामुणकर, श्रद्धा तांबुटकर, जयश्री म्हामुणकर, सुधाकर म्हामुणकर, यशवंत म्हामुणकर, प्रकाश म्हामुणकर, संदीप म्हाप्रळकर उपस्थित होते. या रस्त्याचे डांबरीकरण होत असल्यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 10/Mar/2025