रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टीचे उद्या लोकार्पण

रत्नागिरी : पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्वाच्या ठरणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्ज्वल इतिहासाला उजाळा देणाऱ्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा ६ ऑक्टोबरला होणार आहे.

यामध्ये शिवाजी महाराजांचा २९ फूट उंच पुतळा इथे उभारला जाणार आहे. किल्ल्यांच्या प्रतिकृती असणार आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.

पालिकेचे लोकमान्य बाळगंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व शिवसृष्टीचे लोकार्पण करण्याचे निश्चित झाले आहे. भगवती किल्ला येथील शिवसृष्टी प्रकल्प रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. प्रादेशिक पर्यटनअंतर्गत रत्नदुर्ग किल्ल्याच्या पुरातन तटबंदीजवळ ही शिवसृष्टी उभारली जाणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा आणि प्रेरणा देणारी ही शिवसृष्टी असणार आहे. त्याचबरोबर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्व मोफत सेवा सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार ठरणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून इतर अनेक विकासकामांसह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि शिवसृष्टी साकारत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 05-10-2024